फ्लोरिडा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. फ्लोरिडाच्या पश्चिमेला मेक्सिकोचे आखात, पूर्वेला अटलांटिक महासागर तर उत्तरेला जॉर्जिया व अलाबामा ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिको…फ्लोरिडा हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय टोकापाशी वसलेले फ्लोरिडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. फ्लोरिडाच्या पश्चिमेला मेक्सिकोचे आखात, पूर्वेला अटलांटिक महासागर तर उत्तरेला जॉर्जिया व अलाबामा ही राज्ये आहेत. फ्लोरिडाचा राज्याचा बराचसा भूभाग मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर ह्यंमधील द्वीपकल्पावर वसला आहे ज्यामुळे फ्लोरिडाला २,१७० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. फ्लोरिडाच्या वायव्य भागात पूर्व-पश्चिम धावणारा एक चिंचोळा पट्टा आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये फ्लोरिडा पॅनहॅंडल असे संबोधतात. फ्लोरिडाच्या दक्षिणेला सुमारे ४,५०० लहान-मोठ्या बेटांचा एक द्वीपसमूह असून की वेस्ट हे सर्वात पश्चिमेकडील बेट आहे. टॅलाहासी ही फ्लोरिडाची राजधानी, जॅक्सनव्हिल हे सर्वात मोठे शहर तर मायामी-फोर्ट लॉडरडेल, टँपा, सेंट पीटर्सबर्ग, ओरलॅंडो ही येथील इतर मोठी शहरे आहेत.