चिलेचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलेच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलेला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलेच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टि…चिलेचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलेच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलेला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलेच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलेने आपला हक्क सांगितला आहे.